सीआरपीसी कलम 149 ची नोटीस काय आहे? सीआरपीसी कलम 149 नोटीस कोणाविरुध्द काढली जाते. Cr.PC 1973

 


सीआरपीसी कलम 149 ची नोटीस काय आहे? सीआरपीसी कलम 149 नोटीस कोणाविरुध्द काढली जाते.


Cr.PC 1973
फौजदारी प्रक्रीया संहिता 1973


नमस्कार मित्रांनो आपण आजच्या लेखात सीआरपीसी कलम 149 विषयी जाणुन घेणार आहोत. सीआरपीसी 149 ची नोटीस कोणावर बजावता येते ते देखील आपण अभ्यासणार आहोत. तर चला मग बघुया काय आहे सीआरपीसी 149 ची नोटीस-

कलम.149 पोलीसांनी दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे.


या कलमानुसार पोलीस दलातील प्रत्येक अधिकारी म्हणजेच पोलीस कॉन्स्टेबल पासुन तर पोलीस दलातील सर्वोच्च अधिकारी पोलीस महासंचालकांपर्यंत सर्वांना दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी पुर्ण सामर्थ्यानिशी हस्तक्षेप करण्याचा अधिकार प्राप्त आहे.

सीआरपीसी कलम 149 ची नोटीस काय आहे? सीआरपीसी कलम 149 नोटीस कोणाविरुध्द काढली जाते.


कलम 149 ची नोटीस कोणावर बजावली जाते?


ज्या इसमांमुळे कायदा व सुव्यवस्था बिघडुन दखलपात्र अपराध घडु शकतात. ते अपराध घडुच नये म्हणुन कलम 149 ची नोटीस देवुन सदर इसमांना स्थानबध्द केले जाते. व दखलपात्र अपराधांना प्रतिबंध केला जातो.

उदा. मागील काही दिवसापुर्वी  अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी आपण मातोश्री वर जाऊन हनुमान चालीसा वाचु असे आव्हान केले होते. व त्या मुंबईला गेल्या होत्या, परंतु त्यांनी जर मातोश्री वर जाऊन हनुमान चालीसाचे वाचन केले असते तर मुंबई तसेच संपुर्ण महाराष्ट्रात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवला असता परंतु नवनीत राणा मातोश्रीवर जाण्यापुर्वीच त्यांना सीआरपीसी कलम 149 ची नोटीस देवुन स्थानबध्द करण्यात आले व  त्यांच्यामुळे घडु पाहणाऱ्या  दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करण्यात आले होते. तुम्हाला या उदाहरणावरुन कलम 149 काय असते हे समजले असेलच.

म्हणजेच कलम 149 हे चॅप्टर केसेच सारखेच आहे. अपराध घडण्यापुर्वीच त्याला प्रतिबंध करण्यात येतो.

टीपा:-


टीप 1.या कलमाचा उद्देश:-

 दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करणे हा असुन यावर मार्गदर्शन करणारे कलम आहे.

टीप 2. या कलमाची फोड:- पुढीलप्रमाणे आहे.


1.प्रत्येक पोलीस अधिकारी हस्तक्षेप करु शकतो.

2.दखलपात्र अपराध घडु नये म्हणुन-

3.प्रत्येक पोलीस अधिकारी त्याच्या पुर्ण सामर्थ्यानिशी प्रतिबंध करेल.(Best Of His Ability)

टीप:-3 कलम 149 कोणत्या तत्वावर


आधारीत आहे.

1.रोगावर उपचार करण्यापेक्षा तो हावुच नये म्हणुन योग्य प्रतिबंध करणे.(Prevention Is Better Than Cure)

2.योग्य वेळी एक टाका मारला तर पुढचे नऊ टाके वाचतात.(A Stich In Time Saves Nine.)

3. तहान लागण्यापुर्वीच विहीर खणणे केव्हाही चांगले.


टीप:-4 दखलपात्र अपराध:-


दखलपात्र अपराध म्हणजे सीआरपीसी कलम 2 (ग) प्रमाणे ज्या अपराधांकरीता पोलीसांना मॅजिस्ट्रेटच्या वारंटाशिवाय अटक करता येते. तसेच जे अपराध सीआरपीसी मधील अनुसुची क्रमांक 1मधील स्तंभ चार प्रमाणे दखलपात्र म्हणुन दर्शविले आहेत आणि असे अपराध जर बिगर आपीसीच्या इतर कायद्यातील असतील तर या अनुसुचीत शेवटी कलम 511 संपल्यानंतर सुचित केल्याप्रमाणे ज्या अपराधांना मृत्युदंड – आजन्म कारावास किंवा सात वार्षापेक्षा जास्त शिक्षा आहे. ते सर्व अपराध दखलपात्र असतात. बिगर जामीनाचे आणि सेशन कमीट असतात.त्याचप्रमाणे ज्या अपराधांना तीन वर्षापेक्षा जास्त व सात वर्षापेक्षा कमी असते, ते अपराध पण दखलपात्र अपराध असतात. आणि बिगर जामीनाचे व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांपुढे चालणारे असतात. पण जर तीन वर्षापेक्षा कमी शिक्षेचे अगर केवळ दंडाच्या शिक्षेचे असतील तर ते N.C म्हणजेच अदखलपात्र अपराध असतात.आणि जामीनपात्र व प्रथमवर्ग न्यायाधिशापुढे चालणारे असतात.


टीप:- 5 पोलीस अधिकारी म्हणजे कोण?


पोलीस अधिकारी म्हणजे शिपायापासुन तर थेट वरीष्ठ अधिकारी पोलीस महासंचालकांपर्यंत येतात. मु.पो.कायदा सन 1951 कलम 2(4) प्रमाणे कनिष्ठ दर्जाचा पोलीस अधिकारी हा शिपाई मध्ये मोडतो. आणि पोलीस अधिकारी म्हणजे कलम 2(11) प्रमाणे पोलीस दलातील कोणतीही व्यक्ती आणि कलम 21 व 22 प्रमाणे नेमलेले अधिकारी होय.

FAQ:-

1. कलम 149 ची नोटीस कशासाठी बजावली जाते?

उत्तर-कलम 149 ची नोटीस दखलपात्र अपराधांना प्रतिबंध करण्यासाठी बजावली जाते.

2.कलम 149 ची नोटीस कोण बजावु शकतो ?

उत्तर-कलम 149 ची नोटीस पोलीस दलातील पोलीस शिपायापासुन तर महासंचालकांपर्यंत कोणीही बजावु शकतो.

3.कलम 149 ची नोटीस कोणावर बजावली जाते ?

उत्तर -लम 149 ची नोटीस ज्यांच्यामुळे दखलपात्र अपराध घडण्याची शक्यता असते, अशा प्रत्येक व्यक्तींवर बजावता येते.





कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.