What Is Article 354? स्त्रीचा विनयभंग म्हणजे काय? What Is Assault Or Crimnal Force To Woman Intent To Outrage Her Modesty?
Indian Penal Code 1860 Article 354
भारतीय दंड संहिता 1860 कलम 354
What Is Article 354? स्त्रीचा विनयभंग म्हणजे काय? What Is Assault Or Crimnal Force To Woman Intent To Outrage Her Modesty?
कलम 354 स्त्रीचा विनयभंग करणे.
या कलमाप्रमाणे दोन प्रकारचे गुन्हे एकत्र केले आहेत म्हणजेच कलम 350 व कलम 351 . त्यामुळे स्त्रीचा विनयभंग होण्याकरिता जरी शारीरिक स्पर्श केला नसेल परंतु तिच्याकडे वाईट हेतूने अगर नजरेने पाहणे अगर तशी तयारी करणे हा देखील गुन्हा आहे. आयपीसी कलम 10 प्रमाणे कोणत्याही वयाच्या स्त्रीबाबत हा गुन्हा होतो. तसेच काही प्रसंगी एखादी स्त्री देखील हा गुन्हा दुसऱ्या स्त्रीबाबत करू शकते कारण. आयपीसी कलम 8 प्रमाणे तो याचा अर्थ ती होऊ शकतो.
या कलमातील कोणत्याही एका वर्णनाची 2 वर्षापर्यंत असेल कशी कारावासाची शिक्षा किंवा द्रव्यदंड किंवा दोन्हीही या शब्दांऐवजी कोणत्याही एका वर्णनाची एका वर्षापेक्षा कमी नाही आणि जी 5 वर्षापर्यंत वाढविता येईल कशी कारावासाची शिक्षा देण्यात येईल आणि तो द्रव्यदंडासही पात्र ठरेल. हे शब्द नवीन घालण्यात आले आहेत.
टीप कलम 354 मध्ये सुधारणा करण्यात आली असून, श्री चा विनयभंग करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हमला किंवा फौजदारी पात्र बलप्रयोग करणाऱ्यास कोणत्याही वर्णणाचा पाच वर्षापर्यंतचा कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितली आहे. कमीत कमी कारावास एक वर्षे आणि द्रव्यदंड अशी तरतूद केली आहे.
( फौजदारी कायदा सुधारणा अधिनियम 2013 (13 )अन्वये पुढील नवीन कलमे घातलेली आहेत.)
कलम 354 -अ लैंगिक छळवणूक आणि लैंगिक छळवणूकीसाठी शिक्षा.
(1) एखादा मनुष्य खालीलपैकी कोणतीही कृती करीत असेल तर-
i) शरीरस्पर्श आणि नकोसे वाटणाऱ्या स्पष्ट लैंगिक संबंधासाठी मैत्री संपादन करण्याचा प्रयत्न किंवा
ii) लैंगिक मेहर नजर करण्याची मागणी किंवा विनंती, किंवा
iii) एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरुद्ध तिला बिभत्स, अश्लील साहित्य दाखविणे.(साहित्य म्हणजे लेख चित्रे)
iv) अश्लीलता पूर्ण उल्लेख करणे, अश्लील बोलणे.
तर तो लैंगिक छळवणुकीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरेल.
2. जो कोणी उपकलम (1)च्या पोट कलम (i) किंवा (ii) मध्ये स्पष्ट केलेला अपराध करील . त्याला तीन वर्षापर्यंत सश्रम कारावास किंवा द्रव्यदंड किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.
3. जो कोणी उपकलम (1) च्या पोटकलम (iv) मधील अपराध करेल त्याला कोणत्याही एका वर्णनाची एक वर्षापर्यंतची कारवासाची किंवा दरिदंडाची किंवा दोन्ही शिक्षा दिल्या जातील.
या कलमांमध्ये लैंगिक संबंधासाठी मैत्री आणि शरीरस्पर्श, लैंगिक मेहेरनजर करण्याची मागणी आणि अश्लील साहित्य दाखविणे हे गंभीर स्वरूपाचे अपराध मानले गेले असून, त्यास तीन वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगण्यात आलेल्या आहेत. तर अश्लील शेरे मारणे किंवा बोलणे यासाठी एक वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा सांगितली आहे.
Read More What Is Pre-Arrest Bail?
354 ब स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने हिंस्त्र हल्ला करणे किंवा गुन्हेगारी स्वरूपाचा बलप्रयोग करणे.
जो कोणी स्त्रीला विवस्त्र करण्याच्या उद्देशाने तिच्यावर हिंस्त्र हल्ला करेल किंवा असा हल्ला करण्यास सहाय्य करील किंवा तिला नग्न होण्यासाठी सक्ती करेल, त्याला कोणत्याही एका वर्णनाची तीन वर्षाहून कमी नाही, पण जो सात वर्षापर्यंत वाढवता येईल इतक्या कारावासाची शिक्षा दिली जाईल आणि जो द्रव्य दंडाच्या शिक्षेची पात्र ठरेल.
टीप कोणत्याही स्त्रीला विवस्त्र होण्यासाठी तिच्यावर हिंस्त्र हल्ला करणे किंवा असा करण्यासाठी सहाय्य करणे हे 2013 च्या 13 ह्या सुधारणा कायद्याने गुन्हा असून असे कृत्य करणाऱ्यास किंवा स्त्रीला नग्न होण्यासाठी सक्ती करणाऱ्यास या सुधारणा कायद्याने शिक्षा पात्र गुन्हा ठरविले आहे. अशा गुन्ह्यास सात वर्षांपर्यंत कोणत्याही एका वर्णनाचा करावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितलेली आहे.
कलम 354 क स्त्रीच्या अवयवांकडे बघून,नैसर्गिक कृती करताना बघून लैंगिक समाधान मिळविणे.
स्त्रीला नेहमी असे वाटते की ती खाजगी कृती करताना आपल्याला दुष्कृत्य करणारा किंवा त्याच्या वतीने दुसरा कोणी बघत नाही किंवा तशी खाजगी कृती करताना बघितल्याचा प्रचार करीत नाही अशा परिस्थितीत जो कोणी स्त्रीला खाजगी कृती करताना बघेल किंवा तिची छबी,प्रतिमा नजरेत घेईल त्याला पहिल्या गुन्ह्याकरिता, कोणत्याही एका वर्णनाचा एक वर्षापेक्षा कमी नाही पण तीन वर्षापर्यंत वाढेल अशा कारावासाची आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल आणि अशाच प्रकारच्या दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी कोणत्याही एका वर्णनाचा तीन वर्षाहून कमी नाही; परंतु सात वर्षांपर्यंत असेल असा कारावास आणि द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
स्पष्टीकरण 1 - ह्या कलमाकरिता खाजगी कृती या शब्दांमध्ये अशा कृत्यांचा समावेश होतो की जे करताना सामान्यता गुप्तता किंवा खाजगीपणा राखला जातो आणि तसे करीत असताना त्या व्यक्तीचे जनेंन्द्रिय किंवा नितंब किंवा स्तन अनाच्छादीत असताना किंवा फक्त अंतर्वस्त्राने अच्छादीत असताना किंवा फक्त ती व्यक्ती प्रसाधन गृहाचा वापर करीत असते किंवा लिंग संबंधित कृती करीत असते की जी सामान्यतः सर्वांसमोर केली जात नाही.
स्पष्टीकरण 2- लैंगिक छळाला बळी पडलेल्या व्यक्तीने आपली छबी पकडण्यास, बघण्यास संमती दिलेली असेल पण त्रयस्थ व्यक्तीला दाखविण्यास संमती दिलेली नसेल तर ती त्रयस्थ व्यक्तीला ती दाखविणे किंवा असा फैलाव करणे किंवा बभ्रा करणे या कलमाखाली गुन्हा समजला जाईल.
टीप- स्त्रियांच्या अवयवाकडे बघून लैंगिक समाधान मिळविणाऱ्या अपराध्यांना शिक्षा सांगणारे कलम आहे. नैसर्गिक कृत्य करताना म्हणजे सामान्यपणे शौच किंवा लघवी करीत असताना आपल्याला कोणी बघत नाही अशी प्रत्येक स्त्रीची इच्छा असते. तीच बाब लैगिक कृत्याच्या बाबतीत आहे. नैसर्गिक किंवा लैंगिक कृत्य करीत असताना तिला बघणे, न्याहाळणे, त्याचप्रमाणे दुसऱ्या व्यक्तीला तसे करण्यास सांगणे किंवा त्याबाबत इतरांकडे बभ्रा करणे हा गुन्हा आहे, हे स्पष्ट करणारे हे कलम आहे.
या कलमाखाली दिलेल्या स्पष्टीकरणांमध्ये खासगी कृती म्हणजे नैसर्गिक कृत्य असे स्पष्ट केले आहे. स्त्रीचे जनेंन्द्रिय नितंब किंवा स्तन अनाच्छादीत असताना ते बघणे, दुसऱ्याला बघण्यास सांगणे आणि बघितल्याचे सांगणे या कलमाखाली गुन्हा आहे.
Read More What Is Curruption?
354 ड स्त्रीचा पाठलाग करणे. (Stalking)
एक जो कोणी-
i) एखाद्या स्त्रीने स्पष्टपणे तटस्थता दर्शविली किंवा स्वारस्य दर्शविले नाही तरी तिचा पाठलाग करतो आणि तिच्याशी संपर्क साधतो किंवा तिच्याशी वैयक्तिक परस्पर संबंध वृध्दींगत करण्याचा प्रयत्न करतो. किंवा
ii) एखाद्या स्त्रीने केलेल्या इंटरनेट किंवा ई-मेल किंवा अन्य इलेक्ट्रॉनिक संपर्क माध्यमातून बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्याने स्त्रीचा पाठलाग केल्याचा गुन्हा केला आहे. असे समजले जाते.
मात्र ती व्यक्ती सिद्ध करेल की
i) कसा पाठलाग गुन्हा रोखण्यासाठी आणि गुन्हा अन्वेषणासाठी होता आणि पाठलाग केल्याचा आरोप केलेल्या व्यक्तीवर शासनाने गुन्हा रोखण्याची आणि गुन्हा अन्वेषणाची जबाबदारी सोपविली होती किंवा
ii) असा पाठलाग कायद्यानुसार होता किंवा कोणत्यातरी परिस्थितीनुरुप होता किंवा कायद्याने सोपविलेल्या आवश्यकतेनुसार होता. किंवा
iii) विशिष्ट परिस्थितीमध्ये तसे वागणे योग्य आणि न्याय होते.
तर या कलमाप्रमाणे पाठलाग करणे हा लपून छपून पाठलागाचा गुन्हा ठरणार नाही.
2. जो कोणी महिलेच्या पाठलागाचा, तिच्यावर पाळत ठेवण्याचा, तीची इच्छा नसताना ओळख करण्याचा इत्यादी. गुन्हा करील त्यास कोणत्याही एका वर्णनाची तीन वर्षेपर्यंत वाढविता येईल इतक्या करावासाची शिक्षा होईल आणि त्यास द्रव्यदंडाची शिक्षा होईल. दुसऱ्या किंवा त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी कोणत्याही एका वर्णनाचा पाच वर्षापर्यंत करावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितली आहे.
टीप:- स्त्रीचा /महीलेचा पाठलाग करणे, तिच्यावर पाळत ठेवणे, तिची इच्छा नसतांना ओळख काढुन परस्पर संबंध वाढविण्याचा गुन्हा करणे, हा कायदा (सुधारणा) अधिनियम (2013 चा 13) अन्वये गुन्हा ठरविण्यात आला आहे. संगणकीय माध्यमातुन अशी ओळख वाढविणे हा देखील गुन्हा ठरविण्यात आला आहे. अशी पहील्या गुन्हयासाठी तीन वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड व दुसऱ्या व त्यानंतरच्या गुन्ह्यासाठी पाच वर्षापर्यंत कारावास आणि द्रव्यदंड अशी शिक्षा सांगितलेली आहे.

Post a Comment