मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 The Bombay Prevention Of Gambling Act, 1887
मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887
The Bombay Prevention Of Gambling Act, 1887
मित्रांनो आपण आजच्या लेखात मुंबई जुगार प्रतिबंधक अधिनियम 1887 या कायद्याचा अभ्यास करणार आहोत.तर चला सुरवात करुया.
कलम 3 व्याख्या
जुगार:-
जुगार याचा अर्थ पैज मारणे किंवा सट्टा बेटिंग करणे परंतु जुगारमध्ये खालील गोष्टी येत नाहीत.
सरकारतर्फे ज्या दिवशी घोड्यांच्या शर्यती जाहीर झालेल्या असतात. तसेच काही वेळेस कुत्र्यांच्या शर्यती जाहीर झालेल्या असतात. तर आतील पटांगणाच्या आवारात जर पैज किंवा सट्टा बेटिंग केली तर तो जुगार नसतो.
जुगाराची साधने:-
जुगाराची साधने यात 4 प्रकार सांगितलेले आहेत.
1. ज्यावर जुगार खेळला जाईल असे कोणतेही साधन,
2. जुगार खेळण्याकरिता जे रेकॉर्ड अगर रजिस्टर असते ते,
3. जुगारापोटी जमविलेला पैसा,
4. अगर जुगार खेळण्याकरिता जाहीर केलेली बक्षिसे पैशाचे स्वरूपात अगर वस्तूचे स्वरूपात.
Read More Google Search Console म्हणजे काय?
जुगाराचा सार्वजनिक अड्डा:-
सार्वजनिक जुगाराचा अड्डा याचा अर्थ या जागेत खालील सहा प्रकारचे जुगार खेळले जातात ती जागा-
जागा याचा अर्थ कोणतीही खोली अगर घर अगर तंबू अगर तात्पुरती बंद केलेली जागा किंवा एखादे वाहन वरील ठिकाणी खाली दिलेल्या सहा प्रकारचा जुगार खेळला जातो.
अ. कापूस अगर इतर वस्तू यांचे बाजारातील भाव.
ब. वरील वस्तूंबाबत जे भावांचे फरक होतात त्यावर.
क.शेअरच्या भावाबाबत
ड. पाऊस पडेल किंवा न पडेल किंवा इतर नैसर्गिक घटना घडेल किंवा न घडेल
इ. एखाद्या दिवशी किती इंच पाऊस पडेल यावर.
फ. पत्त्यांचा वापर करून अगर चित्रांचा वापर करून जुगार खेळणे.
कलम 4: सार्वजनिक जुगाराचा अड्डा चालविणे
कलम 4 प्रमाणे चार प्रकारचे आरोपी गुन्हेगार होतात.
अ.एखाद्या जागेचा स्वतंत्र मालक आहे तो आरोपी होतो.
ब. एखाद्या जागेचा इसम भाडेकरी असतो अगर त्याचा वापर तो करीत असतो तो आरोपी होतो.
क. एखाद्या इसमाकडे देखभाल करण्याकरिता ती जागा असते असे असताना तो त्याचा वापर करतो.
ङ एखादा इसम जुगार चालविण्याकरिता आर्थिक मदत करतो.
वरील सर्व प्रकारच्या आरोपींना याच कलमाखाली 2 वर्षे पावेतो शिक्षा आणि दंड सांगितला आहे.
पहिला गुन्हा असल्यास- कमीत कमी 3 महिने शिक्षा व 500/ रुपये दंड
दुसरा गुन्हा असल्यास- कमीत कमी 6 महिने शिक्षा व 1000/ रुपये दंड
तिसरा अगर नंतरचा गुन्हा असल्यास- कमीत कमी 1 वर्ष शिक्षा व 2000/ रुपये दंड
या कलमाखाली केवळ जामिनावर सोडता येत नाही.
Read More नविन ब्लॉग तयार करुन पैसे कसे कमवायचे?
कलम 5 सार्वजनिक जुगाराच्या अड्ड्यात इतर इसम मिळून आल्यास शिक्षा.
कलम पाच प्रमाणे सार्वजनिक जुगाराड्यात जर इतर मिळून आले आणि ते त्या ठिकाणी जुगार खेळत होते अगर केवळ हजर होते तर त्यांना 6 महिने पावेतो शिक्षा आणि दंड सांगितला आहे.
पहिल्या गुण्याकरिता- कमीत कमी 1 महिना शिक्षा आणि 200/ रुपये दंड
दुसऱ्या गुण्याकरिता- कमीत कमी 3 महिने शिक्षा आणि 200/ रुपये दंड
तिसरा आणि नंतरचा गुन्हा असेल तर- कमीत कमी 6 महिने शिक्षा आणि 200/ रुपये उदंड
या ठिकाणी केवळ हजर असणे याबाबत विरुद्ध गोष्ट होईपर्यंत त्याच्याविरुद्ध अनुमान काढता येतो
कलम 6 बंदिस्त जागेची झडती घेण्याबाबत.
कलम 6 प्रमाणे वॉरंट देण्याबाबत 3 प्रकार सांगितले आहेत ते खालील प्रमाणे.
1. पोलीस आयुक्तांच्या कार्यक्षेत्रात पोलीस आयुक्त, पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यास असे लेखी वॉरंट देतात.
2. इतर ठिकाणी डिस्ट्रिक मॅजिस्ट्रेट अगर प्रांत अगर पोलीस अधिक्षक अगर सहाय्यक पोलीस अधीक्षक किंवा पोलीस उपअधीक्षक यांना अधिकार असल्यास ते लेखी वारंट देतात.
3. याशिवाय इतर ठिकाणी जर आगाऊ गॅजेट काढून ज्या अधिकाऱ्यांना असे वारंट मिळण्याचा डि.एम. ने हुकूम केला असेल तर,
सदरचे लेखी वॉरंट मिळाल्यानंतर दिवसा अगर रात्री त्या जागेत प्रवेश करण्याचा अधिकार आहे झडतीला हरकत घेतल्यास जबरदस्तीने प्रवेश करता येतो आणि त्यानंतर तेथे मिळून आलेले आरोपी आणि इतर माल ताब्यात घेता येतो किंवा जप्त करता येतो.
सदरच्या वारंटात जर काही तांत्रिक चूक असेल तर त्यामुळे वॉरंट बेकायदेशीर होत नाही तसेच स्थानिक पंच जरी घेतले नाही तरी झडती बेकायदेशीर होत नाही.
Read Moreकर्फ्यु म्हणजे काय?
कलम 6 नाव-गाव सांगण्यास नकार देणे.
सार्वजनिक जुगारात जे आरोपी मिळून आले आणि त्यांना नाव-गाव विचारले असता त्यांनी ते सांगण्याचे नाकारल्यास अगर खोटे सांगितल्यास या कलमान्वये 1000/ रुपये पावेतो दंड आणि 4 महिने पावतो शिक्षण सांगितली आहे.
कलम 7 जुगाराच्या साधनांबाबत अनुमान.
एखाद्या जागी जुगाराबाबत झडती घेतली आहे आणि तेथे जुगाराची साधने सापडली आहेत आणि ती पाहिल्यानंतर पोलिसांना असे वाटते की ती जुगाराचीच साधने आहेत तर खालील प्रकारचे निर्माण काढता येते.
1. ती जागा सार्वजनिक जुगाराचा अड्डा आहे
2. अगर जे इसम त्या ठिकाणी मिळून आले ते जरी प्रत्यक्ष जुगार खेळत नसले तरी ते गुन्हेगार होतात, तसेच या कलमाखाली कलम 6 मधील वारंटात जर काही कारकुनी चुक असेल तर ते महत्त्वाचे मानले जाणार नाही.
कलम 12 सार्वजनिक ठिकाणी जो जुगार चालतो त्याबाबत काही तरतुदी
अ.एखाद्या सार्वजनिक जागेत काही इसम जुगार खेळत आहेत.
ब कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी प्राण्यांची अगर पक्षांची झुंज लावून जुगार खेळत आहेत.
क वरील प्रकारचा जुगार चालू असताना त्या ठिकाणी जे इसम हजर राहून प्रात्साहान देतात अगर मदत करतात.
या गुन्ह्यांकरिता शिक्षा 300 रुपये पावेतो दंड अगर तीन महिने पावेता शिक्षा सांगितली आहे.
याच कलमाखाली जी साधने मिळून आली किंवा जे आरोपी मिळून आले ते त्या ठिकाणी जुगार खेळण्याकरिता हजर होते असे अनुमान काढता येतो.
कलम 12 वर्तमानपत्रातून छपाई करून अगर चित्त्याच्या पाट्या छापून जो जुगार खेळला जातो त्याबाबत तरतूद
याकरिता दोन कलमे दिली आहेत 12(अ) आणि 12(ब) ती कलमे खालील प्रमाणे -
12(अ) कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास वॉरंट शिवाय खालील इसमांना अटक करता येते
जे इसम छपाई करून अगर इतर मार्गाने छापलेला मजकूर विक्री करतात अगर वितरण करतात आणि त्यामागे जुगार खेळणे सोपे जावे हा इरादा असतो.
अशा प्रकारच्या जुगाराला कलम 4 प्रमाणे शिक्षा सांगितली आहे.
कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यास कोणत्याही बंदिस्त जागी जाऊन झेडपी घेता येते
कलम 12 (ब)वरील प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर कोर्टाला असे अनुमान काढता येते की, जी साधने सापडली ती जुगारात करिताच होती आणि आरोपीने मदत केली आहे.
जुगार कायद्याखाली अनुमान काढणे.
कलम 5 प्रमाणे बंदिस्त जागेत आरोपी मिळून आले तर अनुमान काढता येते.
कलम 7 प्रमाणे वॉरंट घेऊन झडती घेतल्यास जी साधने सापडतात त्याबाबत अनुमान काढता येते.
कलम 12 (लहान-अ) सार्वजनिक जागेत जे आरोपी मिळून येतात आणि ज्या वस्तू मिळून येतात त्याबाबत अनुमान काढून काढता येते.
कलम 12 (मोठा-ब) मोठा सापडल्यास हनुमान करता येते
निष्कर्ष:-
आपण वरील लेखात मुबई जुगार प्रतिबंधक कायदा 1887 मधील काही व्याख्या आणि त्यामधील शिक्षेच्या तरतदी काय आहेत हे जाणुन घेतले आहे. तरी वरील माहीती आवडल्यास आपल्या मित्र परिवारात सोशल मिडीयाच्या माध्यमातुन शेअर करा.
Follow Us:-
mybiggurupp.blogspot.com
ppedutech.blogspot.com

Post a Comment