भारतीय दंड संहिता 1860 मधील सर्वसाधारण अपवाद. कलम 76 ते कलम 106 पर्यंत.





भारतीय दंड संहिता 1860 मधील सर्वसाधारण अपवाद. कलम 76 ते कलम 106 पर्यंत.


मित्रांनो आपण आजच्या लेखात भारतीय दंड संहिता 1860 मधील सर्वसाधारण अपवाद हे प्रकरण पाहणार आहोत, वरील प्रकरणात आरोपीने केलेले कृत्य केव्हा गुन्हा होत नाही.याबद्दल माहीती दिलेली आहे. त्यामुळे सर्वसामान्य माणसासाठी हे प्रकरण खुप महत्वाचे आहे. चला तर मग बघुया काय आहेत सर्वसाधारण अपवाद तर...



सर्वसाधारण अपवाद

कोणत्या परिस्थितीत आरोपीचे कृत्य गुन्हा नसते.

खालील परिस्थितीत आरोपीने केलेले कृत्य गुन्हा ठरत नाहीत.
भारतीय दंड संहिता 1860 मधील सर्वसाधारण अपवाद. कलम 76 ते कलम 106 पर्यंत.

 

कलम 76 गैरसमजुतीने केलेले कृत्ये.


कायद्याप्रमाणे एखादे कृत्ये करावे लागते परंतु गैरसमज किंवा चूक भूल झाल्यामुळे जरी गुन्हा घडला तरी तो गुन्हा नसतो. उदा. (1) एका पोलीस अधिकाऱ्यास बिगर जामीनाचे अटक वारंट दिलेले आहे परंतु गैरसमजुतीमुळे दुसऱ्याच व्यक्तीस अटक केली तर गुन्हा होत नाही.

उदा. (2) एखाद्या खाजगी नागरिकाने कायद्याने दिलेल्या अधिकाराप्रमाणे चुकीच्या व्यक्तीस अटक केली आहे तर गुन्हा नसतो आयपीसी कलम 43

कलम 79 कायद्याचे समर्थन आहे परंतु वस्तुस्थितीच्या चूक भूलीमुळे केलेले कृत्ये.


एखादी कृती करण्यास व्यक्तीला कायद्याने अधिकार आहे तर त्याची कृती समर्थनीय असते, परंतु वस्तुस्थीतीची चूक-भूल होते आणि सद्भावानेने, प्रमाणिकपणे त्याला असे वाटते की, ती कृती समर्थनी आहे तर केलेले कृत्ये गुन्हा नसते.

कलम 80 अपघाताने केलेले कृत्ये.


दैवयोगाने अगर अचानक अपघाताने जर गुन्हा घडला तर तो गुन्हा नसतो. उदा. मोटर गाडीचे ब्रेक्स अचानक फेल झाले किंवा टायर फुटला, स्टेरिंग रोड तुटला, त्यावेळी अपघात झाला तर तो गुन्हा होत नाही.

कलम 81 मोठा धोका टाळण्याकरिता लहान धोका पत्करणे.


काही वेळेस आरोपी पुढे अशी परिस्थिती असते की मोठा धोका टाळण्या करिता लहान धोका पत्करतो. उदा. एका ड्रायव्हर पुढे अचानक रस्त्याच्या वळणावर दोन गाड्या पुढे आलेले आहेत, एका गाडीत 50 प्रवासी आहेत तर दुसऱ्या गाडीत 5 प्रवासी आहेत अशा वेळेस लहान गाडीला अपघात केल्यास गुन्हा नसतो.

कलम 82 सात वर्षाखालील मुलाचे कृत्य,


कलम 82 प्रमाणे सात वर्षाखालील मुलाचे कृत्य गुन्हा नसते.

कलम 83 सात वर्षापेक्षा मोठा परंतु बारा वर्षापेक्षा लहान मुलाचे कृत्य गुन्हा नसते परंतु तो मुलगा जर समजुतदार असेल तर गुन्हा होतो.


कलम 84 वेड्या माणसाचे कृत्य.


या कलमाप्रमाणे गुन्हा करीत असताना आरोपी जर वेडा असेल तर गुन्हा होत नाही.

कलम 85 दारूच्या नशेत केलेले कृत्ये.


कलम 85 प्रमाणे एखाद्या इसमास दारू अगर मादक पदार्थ सक्तीने अगर नकळत पाजलेले आहे आणि नंतर त्याने काही कृत्य केले तर गुन्हा नसतो.

कलम 86 स्वखुशीने दारूचे सेवन करुन केलेले कृत्ये.


आरोपीने दारूचे सेवन स्वखुशीने केले असेल तर आरोपीने केलेले कृत्य गुन्हा होते मग ती जाणीव इरादा होते.

कलम 90 अयोग्य संमती


या कलमाप्रमाणे अयोग्य संमती म्हणजे काय हे सांगितले आहे .खाली दिलेल्या पाच परिस्थितीत जर संमती दिली असेल तर ती अयोग्य संमती असते.

1.दारूच्या नशेत दिलेली संमती.

2. वेडसर व्यक्तीची संमती.

3. चुकीच्या कल्पना देऊन दिलेले संमती.

4. दुखापत करण्याचे भय दाखवून दिलेली संमती.

5. सक्ती करून दिलेली संमती.

कलम 94 सक्तीने केलेले कृत्ये.


या कलमाप्रमाणे आरोपी जे कृत्य करतो ते करण्यापूर्वी त्याला ठार मारण्याची तात्काळ त्या ठिकाणीच धमकी दिली जाते अगर सक्ती केली जाते तर गुन्हा नसतो परंतु जर असा गुन्हा खुनाचा असेल किंवा केंद्र सरकार आगर राज्य सरकार उलथवुन टाकण्याचा असेल तर तो गुन्हा असतो. फाशीची शिक्षा असलेला


कलम 95 किरकोळ गोष्टींची कायदा दाखल घेत नाही.


कायद्याचे भाषेत गुन्हा पण त्यातील उद्देश पाहता तपास करणे हिताचे नसते.

उदा. एका इसमाने बागेतील पाच आंब्यांची फळे तोडली अगर रस्त्यावरील रेती अगर डांबर काढून घेतले तर कायद्याप्रमाणे जरी चोरी होत असली तरी असा गुन्हा नाकारला जातो.

सीआरपीसी 157 एक व प्रमाणे

आत्म.संरक्षणाचा अधिकार


कलम 96 ते कलम 106 मध्ये आत्मसंरक्षणाचा अधिकार दिलेला आहे.


कलम 96 आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना केलेले कृत्य गुन्हा नसते.


कलम 97 सदरचा अधिकार स्वतःची मिळकत अगर दुसऱ्याची मिळकत याचे विरुद्ध वापरता येतो आयपीसी प्रकरण 17 तसेच सदरचा अधिकार स्वतःचे शरीर अगर दुसऱ्याचे शरीर यांचे रक्षण करण्याकरिता वापरता येतो आयपीसी प्रकरण 16


कलम 98 सदरचा अधिकार एखादा वेडा इसम, अल्पवयीन मुलगा, दारू प्यायला इसम यांच्याविरुद्ध देखील वापरता येतो.


उदा. समजा एखाद्या वेड्या इसमांकडून किंवा अल्पवयीन मुलाकडून किंवा दारू प्यायलेल्या इसमाकडुन तुमच्या जीवाला धोका असेल तर तुम्ही आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरू शकता.

कलम 99 आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरण्याकरिता काही अपवाद अगर मर्यादा आहेत.


1. लोकसेवक काम करीत असताना त्यांच्याविरुद्ध खाजगी व्यक्तीला आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरता येत नाही.

2. खाजगी नागरिक अशा लोकसेवकांना मदत करीत असतील तर त्यांचे विरुद्ध आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरता येत नाही.

3. सरकारी अधिकाऱ्याची मदत मिळण्यास वेळ असेल तर आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरता येत नाही.

4.ज्या प्रमाणात हल्ला असेल त्याच प्रमाणात आपल्याला परत हल्ला करता येतो.

कलम १०० एखाद्या व्यक्तीला ठार केव्हा मारता येतो.


खाली दिलेल्या सहा प्रकारच्या गंभीर गुन्ह्यांकरिता ठार मारण्याचा अधिकार आहे.

1. खुनी हल्ला. कलम 302

2.मोठी दुखापत. कलम 320

3. बलात्काराचा गुन्हा. कलम 376

4. सृष्टी नियमाविरुद्धचा संभोग. कलम 377

5. चोरून नेणे अगर पळवून नेणे. कलम 363 ते 369

6. एखाद्या इसमास गुप्त जागी लपवून ठेवणे. कलम 346

7. ॲसीड फेकणे.

इत्यादी गुन्ह्यांकरिता आत्मसंरक्षणाचा अधिकार वापरताना ठार करता येते. वरील प्रकारचे गुन्हे प्रत्यक्षात घडण्याची आवश्यकता नसते तर, त्याची तयारी किंवा हावभाव केला तरी ठार मारता येते.

कलम 101 वरील सहा प्रकारचे गुन्हे वगळता इतर कमी प्रतीचा गुन्हा असेल तर ठार न मारता इतर कोणतीही दुखापत करता येते.


कलम 102 वरील अधिकार केव्हा सुरू होतो व केव्हा संपविला पाहिजे हे सांगितले आहे म्हणजे, जोपर्यंत भीती आहे तोपर्यंत अधिकार असतो नंतर वापरल्यास गुन्हा होऊ शकतो.


कलम 103 स्वतःची अगर दुसऱ्याची मालमत्ता यांचे रक्षण करण्याकरता ठार मारण्याचा अधिकार.


या कलमाप्रमाणे गंभीर गुन्ह्यांकरिता खाली दिलेल्या पाच कारणांकरिता ठार मारता येते.

1. जबरीची चोरी. आयपीसी कलम 392 ते 394

2. रात्रीची घरपोडी. आयपीसी 457

3. जाळपोळ करून घरजाळणे. आयपीसी 436

4. चोरी आणि अपक्रिया हे गुन्हे घडत असताना फिर्यादीला जर हरकत केली तर स्वतःच्या जीवाला धोका असतो अशा प्रसंगी.

5 सरकारी मिळकत म्हणजेच सरकारी इमारती, मोटार वाहने, रेल्वे, ट्रॉम यांचे जळपोळ करू अगर स्फोटक पदार्थ टाकून नुकसान करणे सदरची तरतूद फक्त महाराष्ट्र राज्यापूर्ती 31.12. 1971 पासून अमलात आली आहे

कलम 104 वरील प्रकारचे गुन्हे वगळता इतर कमी प्रतीचे गुन्हे असतील तर ठार न मारता इतर दुखापत करता येते.


कलम 105 वर दिलेला अधिकार केव्हा सुरू होतो व केव्हा संपतो हे सांगितले आहे म्हणजे जोपर्यंत भीती असते अगर गुन्हा चालू असतो तोपर्यंत अधिकार असतो.


कलम 106 काही वेळेस कलम 100 मध्ये दिलेला अधिकार वापरणे आवश्यक असते परंतु त्या ठिकाणी लहान मुले, स्त्रीया व निरपराधी माणसे असतात आणि चुकून त्यांना गोळी लागल्यामुळे मृत्यु घडून येतो तरीदेखील गुन्हा नसतो. उदा. पोलीस फायरिंग अगर नागरिकांवर झालेला खुनी हल्ला.




वरील लेखात आपण आपीसी मधील सर्वसाधारण अपवाद कोणते ते समजुन घेतले आहे. आशा आहे की,तुम्हाला वरील माहीती समजली असेल. आणि भविष्यात उपयुक्त ठरेल. माहीती आवडल्यास शेअर करा.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.