दखलपात्र गुन्हा,अदखलपात्र गुन्हा, पहीली खबर, N.C., फिर्याद ,चौकशी, अन्वेषण किंवा तपास म्हणजे काय ? Cognizabale offence ,N.C . ,F.I.R , Complaint, ENQUIRY,INVESTIGATION

 



फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 (Code Of Criminal Procedure 1973)

दखलपात्र गुन्हा (अपराध) म्हणजे काय ? What is Cognizabale offence ?

ज्या गुन्ह्यात पोलीसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार आहे ‍किंवा ज्या गुन्ह्यांना 3 वर्षापेक्षा जास्त शिक्षा किंवा जन्मठेपेची  किंवा फाशीची शिक्षा सांगितलेली आहे ते सर्व गुन्हे दखलपात्र गुन्हे (अपराध) असतात.

उदा. चोरी, शरीराविरुध्दचे सर्व अपराध, बलात्कार, खुन इ.

अदखलपात्र अपराध म्हणजे काय ?किंवा  N.C  म्हणजे काय? What is  Non Cognizable Offence?

ज्या अपराधात पोलीसांना वारंटशिवाय अटक करण्याचा अधिकार नाही तो अपराध म्हणजे अदखलपात्र अपराध किंवा Non Cognizable Offence  (N.C.) होय.

. यात ‍किरकोळ स्वरुपाच्या गुन्हयांचा समावेश होतो. उदा.पिक पॉकेटींग, शिवीगाळ करणे, धाकडपटशा करणे, ‍किरकाेळ स्वरुपाची मारमारी इ.

कलम-154 पहीली खबर म्हणजे काय? What is F.I.R(First Information Report)

 अपराध जर दखलपात्र असेल तर कलम 154 नुसार त्याची पहीली खबर लीहीली जाते. पहीली खबर (F.I.R.) लिहुन घेण्याची पध्दत खालील प्रमाणे आहे.

क.154 -1 एखाद्या नागरिकाने ‍दिलेल्या दखलपात्र गुन्हयाची खबर ‍दिल्यानंतर ती प्रथम लिहुन घ्यावी. त्यानंतर त्या फिर्यादीचा गाेषवारा सरकारने नेमुन दिलेल्या पहिली खबर पुस्तकात ‍ कॉलम प्रमाणे लिहावा.

क.154 -2 वरील खबरीची प्रत फिर्यादीला ताबडतोब विनामुल्य देण्यात यावी.

क. 154 -3 वरीलप्रमाणे नक्कल न दिल्यास त्यातील‍ ‍फिर्यादी, समक्ष पोलीस अधिक्षकांकडे जावु शकतो. अगर पोस्टाने आपली फिर्याद पाठवु शकतो आणि त्यानंतर पोलीस अधिक्षक संबंधित पोलीस स्टेशनला तपासाचा आदेश देतात अगर तपास करु शकतात.

Read More चॅप्टर केस म्हणजे काय ? 

पहीली खबर पोलीस स्टेशनला देण्याचे प्रकार

 1.फिर्यादी स्वत: हजर राहतात. 2. पोस्टाने अगर टेलीफोन करुन देखील पहीली खबर देवु शकतात. 3.निनावी अर्ज करुन देवु शकतात. 4. पोलीसांना स्वत:च्या माहीतीवरुन खबर देता येते. 5. आरोपीने दिलेली पहीली खबर .

क.155 N.C. लिहुन घेण्याची पध्दत

क.155 नुसार 4 तरतुदी सांगितलेल्या आहेत त्या खालीलप्रमाणे.

क.155-1 नागरीकाने दिलेली एनसी फिर्याद पोलीस स्टेशनमधील पब्लीक एनसी रजीस्टरला कॉलम प्रमाणे लिहुन घ्यावी आणि नंतर संबंधी मॅजीस्ट्रेट कडे जाण्याची समज द्यावी.

क.155-2 संबंधी फिर्याद वाचल्यावर तपास करणे असेल तर अधिकार असलेल्या मॅजिस्ट्रेटची पुर्व परवानगी द्यावी.

क.155-3 मॅजिस्ट्रेटने परवानगी ‍दिल्यावर दखलपात्र गुन्ह्याच्या तपासाचे सर्व हक्क पोलीसांना मिळतात. फक्त वॉरंटशिवाय अटक करता येत नाही.

क.155-4 एखाद्या एनसी केसमध्ये दोन ‍किंवा अधिक गुन्हे दाखविले आहेत आणि त्यातील एक जरी दखलपात्र असला तरी संपुर्ण केस दखलपात्र होते म्हणजेच परवानगीची गरज असते.

 टीप: अधिकार नसलेल्या मॅजीस्ट्रेटने परवानगी दिल्यामुळे  केलेला तपास चुकीचा नसतो तर तो कोर्टात मान्य करावा लागतो. कारण तशी तरतुद सीआरपीसी कलम 460 (ब) मध्ये दिली आहे.‍


फिर्याद म्हणजे काय ? (Complaint)


 फिर्याद म्हणजे ज्यावेळी एखादी व्यक्ती तोंडी अगर लेखी दंडाधिकाऱ्याकडे तक्रार करते की एखाद्या व्यक्तीने ,मग ती ज्ञात असो किंवा अज्ञात असो,तीने अपराध केला आहे आणि त्या संदर्भात या संहितेखाली कारवाई करावी हा हेतु असतो. पण यात पोलीस अहवालाचा समावेश होत नाही.

 (फिर्यादीकरीता कोणत्याही प्रकारचा विशिष्ट नमुना देण्यात आलेला नाही. फिर्यादीने दंडाधिकाऱ्यांपुढे अशा आशयाच्या गोष्टी ठेवायच्या आहेत की, ज्यावरुन गुन्हा झाला असल्याचे दिसुन येईल. ‍)


चौकशी म्हणजे काय ? (ENQUIRY)


चौकशी याचा अर्थ दंडाधिकाऱ्याने अगर न्यायालयाने या संहितेप्रमाणे केलेली चौकशी होय. पण यात कोर्टापुढे चाललेली संप्ररीक्षा (TRIAL)  चा समावेश होत नाही.

(चौकशी चा अर्थ नेहमी न्यायालयीन चौकशी होत नाही. चौकशी ही दंडाधिकाऱ्यांकडुन होते .उलट गुन्ह्याचा तपास अगर अन्वेषण हा पोलीसांकडुन होत असतो. चौकशी चा उद्देश हा केलेल्या आरोपांची सत्यता पडताळुन पाहणे हा आहे. तर उलट गुन्ह्याचा तपासाचा उद्देश पुरावा गोळा करणे हा असतो. )


अन्वेषण ‍किंवा तपास म्हणजे काय? (INVESTIGATION)


अन्वेषण किंवा तपास याचा अर्थ पुरावा गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्याने केलेल्या अगर न्यायाधीशाने ज्या व्यक्तीस या दृष्टीने अधिकार दिले आहेत, अशा ( न्यायाधिशाहुन अन्य व्यक्तीने ) या सहिंतेमधील तरतुदीप्रमाणे केलेली कार्यवाही होय.

 

 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.