What Is Dying Declaration? मृत्युपुर्व जबाब म्हणजे काय? कबुली जबाब म्हणजे काय? न्यायालयीन कबुली जबाब किंवा बिगर न्यायालीन कबुली जबाब म्हणजे काय? पोलीसांकडे दिलेला कबुली जबाब ग्राह्य असतो का?
भारतीय पुरावा कायदा 1872
What Is Dying
Declaration? मृत्युपुर्व जबाब म्हणजे
काय? कबुली जबाब म्हणजे काय?
न्यायालयी कबुली जबाब किंवा बिगर
न्यायालीन कबुली जबाब म्हणजे काय?
पोलीसांकडे दिलेला कबुली जबाब ग्राह्य
असतो का?
कलम 24 ते 32
आरोपीच्या कबुली जबाब आणि मृत्यूपूर्व जबाब
कबुली जबाब याचा अर्थ जो गुन्हा घडलेला आहे त्यात आरोपीने भाग घेतलेला आहे आणि तो गुन्हा मीच केला आहे अशी कबुली तो देतो त्यालाच कबुली जबाब असे म्हणतात .
त्याचे दोन प्रकार आहेत
1. न्यायाधीशांपुढे दिलेला म्हणजे सीआरपीसी कलम 164 प्रमाणे दिलेला
2. बिगर न्यायालयीन कबुली जबाब म्हणजेच आरोपीने गुन्हा केल्यानंतर आरोपी आपल्या नातेवाईकांपुढे अगर गावातील इतर इसमांपुढे गुन्ह्याची कबुली देतो.
कलम 24 धमकी, प्रलोभन, वचन याद्वारे दिलेला कबुली जबाब ग्राह्य नसतो.
उत्तर- याकरिता कलम 24 दिलेले आहे त्या कलमाप्रमाणे कबुली जबाब देणारा इसम हा कनिष्ठ दर्जाचा असतो आणि तो वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे कबुली जबाब देतो पण तो कबुली जवाब देण्यापूर्वी त्याला दमदाटी केली जाते अगर प्रलोभन दाखवले जाते अगर वचन दिले जाते आणि असा कबुली जबाब घेत असताना त्या व्यक्तीस असे वाटते की, तो कबुली जबाब दिल्यामुळे आपला फायदा होईल किंवा आपल्यावरील संकट टळेल तर असा कबुली जबाब हा ग्राह्य नसतो.
कलम 25 पोलिसांपुढे दिलेला कबली जबाब ग्राह्य नसतो.
उत्तर कलम 25 प्रमाणे कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यासमोर आरोपींनी दिलेला कबुली जबाब ग्राह्य नसतो म्हणजेच तो स्वीकारता येत नाही या कलमातील पोलीस अधिकारी याचा अर्थ पोलिसांशिवाय इतर खाती आहेत आणि ज्यांना पोलिसांप्रमाणे अटकेचे अधिकार आहेत ते देखील कलम 25 प्रमाणे पोलीस अधिकारी समजले जातात तसेच पोलिसांच्या सानिध्यात असताना दिलेला कबुलीजबाब ग्राह्य नसतो
कलम 26 न्यायालयीन कबुली जबाब.
कलम 26 प्रमाणे पोलीस अधिकाऱ्यांनी जर कबुली जबाब देणाऱ्या आरोपीस ताबडतोब मॅजिस्ट्रेट पुढे हजर केले आणि त्याचा कलम 164 प्रमाणे कबुली जबाब नोंदवून घेतला तर तो न्यायालयीन कबुली जबाब असतो आणि तो ग्राह्य असतो.
कलम 27 एखाद्या आरोपीस अटक केलेली आहे आणि नंतर पंचांसमक्ष त्यांने काही गोष्टी कबूल केल्या आहेत आणि त्यानंतर लपविलेला माल काढून दिला आहे तर त्याबाबत दिलेला कबुली जबाब हा ग्राह्य असतो पण याकरिता खालील गोष्टी आवश्यक आहेत.
1. आरोपीवर गुन्ह्याचा चार्ज पाहिजे.
2. तो अटकेत पाहिजे किंवा पोलिसांच्या ताब्यात पाहिजे.
3. पंचांसमक्ष सविस्तर निवेदन केलेले पाहीजे.
4. त्यानंतर लपविलेला माल काढून दिला पाहीजे.
5. काढून दिलेला माल गुन्ह्याशी संबंधित पाहीजे
कलम 28 कोणत्या परिस्थितीत दिलेला कबली जबाब विशिष्ट कारणांकरिता देखील ग्राह्य असतो
कलम 28 प्रमाणे आरोपी कबुली जबाब देत असताना खालील 3 गोष्टी जर नसतील तर असा जबाब ग्राह्य असतो म्हणजेच कलम 28 हे कलम 24 च्या विरुद्ध आहे
1. दमदाटी नसेल तर
2. प्रलाेभन दाखविले नसेल तर
3. वचन दिले नसेल तर
कलम 29 बिगर न्यायालयीन कबुली जबाब
कलम 29 प्रमाणे आरोपी इसम गुन्हा केल्यानंतर गुन्ह्याची माहिती इतरांच्या पुढे देखील सांगतो त्यामुळे तो बिगर न्यायालयीन कबुली जबाब होतो. अशाप्रकारचा दिलेला कबुली जबाब काही वेळेस खाली दिलेल्या 5 प्रकारात मोडतो तरीदेखील तो ग्राह्य असतो
1. खाजगी इसम आरोपीस असे सांगतो की तू जे सांगशील ते मी गुप्त ठेवीन.
2. खाजगी इसम आरोपीला फसवून कबली जबाब देतो
3. गुन्हा केल्यानंतर गुन्ह्याचे दडपण विसरण्याकरिता आरोपीस मादक पदार्थ घेतो आणि त्या नशेत असताना कबुली जबाब देतो.
4. आरोपीला पूर्व सुचना न देता तो खाजगी माणसापुढे कबुली जबाब देतो
5.गुन्हा केल्यानंतर आरोपी जबाब देण्यास बांधलेला नसतो तरी देखील खाजगी माणसांपुढे काही प्रश्न विचारल्यानंतर तो आपणहून उत्तरे देतो
कलम 30 एका आरोपीचा कबुली जबाब इतर आरोपींविरुद्ध वापरता येतो
कलम 30 प्रमाणे कोर्टापुढे दोन किंवा अधिक आरोपींनी एकत्रितपणे गुन्हा केल्याची केस चालू आहे आणि त्यापैकी एका आरोपीने कबुली जबाब दिलेला असतो नंतर अशी केस कोर्टापुढे पुर्ण झाल्यानंतर मॅजेस्ट्रेट इतर आरोपींना प्रश्न विचारतात की, आरोपी नंबर 1 ने दिलेल्या कबुली जबाबात तुझा संबंध दाखविलेला आहे, तर त्याचे उत्तर लिहुन घेतल्यानंतर मॅजीस्ट्रेट आरोपी नं १ चा कबुली जबाब विचारात घेवु शकतो.
स्पष्टीकरण- गुन्हा याचा अर्थ पुण्याचा प्रयत्न अगर सहाय्य करणे
कलम 31 प्रमाणे केलेले निवेदन त्या माणसांवर बंधनकारक असते परंतु तो अखेरचा निर्णायक पुरावा नसतो
कलम 32-1 मृत्युपुर्व जबाब म्हणजे काय ? Dying Declareration.
मृत्युपूर्व जबाब ग्राह्य होण्याकरिता कलम 32 -1 दिलेले आहे. त्याप्रमाणे त्या जबाबात मृत्यूचे कारण दिले पाहिजे.आणि आधीची परिस्थिती सांगितली पाहिजे आणि नंतर मग मृत्यू झाला आहे तर ती परिस्थिती ग्राह्य आहे
मृत्युपुर्व जबाबबाचे तत्व-
कायदा असे मानतो की,जखमी इसम मृत्यु दारात असतो,म्हणजेच अखेरीस ईश्वराला भेटण्याच्या तयारीत असतो त्यावेळेस तो खोटे बोलू शकत नाही
मृत्युपुर्व जबाब कोणास घेता येतो?
मृत्युपर्व जबाब हा कोणालाही घेता येतो म्हणजेच ,मॅजेस्ट्रेट , डॉक्टर ,पोलीस अधिकारी किंवा त्याचे नातेवाईक किंवा नागरिक
मृत्यूपूर्व जबाब
मृत्यूपूर्व जबाब तोंडी अगर लेखी, सही असो अगर नसो ,तसेच जखमी इसम बोलण्याचे अवस्थेत नसेल तर खाना खुणा करून देखील घेता येतो
मृत्यूपूर्व जबाबाचे कायद्यात महत्त्व
असा मृत्यूपूर्व जबाब सदरचा इसम जर मयत झाला तर तो जबाब कायद्यात ग्राह्य असतो आणि जर कोर्टाला असा जबाब स्वखुशीचा आणि खरा वाटला तर शिक्षा देता येते. परंतु असा इसम जरजिवंत राहिला तर नंतर त्याची साक्षी होत असताना पुष्टीदायक पुरावा म्हणून वापरता येतो किंवा असाही इसम साक्ष देताना उलटल्यास किंवा फितल्यास त्याची उलट तपासणी करण्याकरिता अगर विसंगती दाखविण्याकरिता पुरावा कायदा कलम 154 आणि 145 प्रमाणे वापरता येतो
मृत्यूपूर्व जबाबाचा काही नमुना आहे काय?
मृत्यूपूर्व जबाबाचा ठराविक नमुना नाही परंतु शक्यतो प्रश्न आणि उत्तर या स्वरूपात तो लिहून घ्यावा लागतो तसाच तो थोडक्यात आणि मुद्देसूद असावा थोडक्यात हल्ला कोणी केला, कोठे केला, का केला हे त्यात असावे
वरील सर्व गोष्टी लक्षात घेता पुरावा कायद्यात मृत्यूपूर्व जबाबास अतिशय महत्त्व दिलेले आहे आणि त्यामुळे पोलिसांपुढे जरी असा जबाब दिला तरी तो कायद्यात स्वीकारला जातो कारण अशी तरतूद सीआरपीसी कलम 162 पोट कलम 2 मध्ये दिलेली आहे

Post a Comment