What Is Fundamental Right? मुलभुत हक्क म्हणजे काय? मुलभुत हक्कांचा अर्थ महत्व व वैशिष्टये कोणते? मुलभुत हक्क किती व कोणते?





Constitution Of India


What Is Fundamental Right? मुलभुत हक्क म्हणजे काय? मुलभुत हक्कांचा अर्थ महत्व व वैशिष्टये कोणते? मुलभुत हक्क किती व कोणते?


मूलभूत हक्क


प्रस्ताविक


लोकशाही देशांमध्ये व्यक्तींना काही मूलभूत हक्क प्रदान केले जातात, ज्यांचे संरक्षण देशातील न्यायव्यवस्थेमार्फत केले जाते. भारतीय राज्यघटनेच्या भाग III कलम 12 ते 35 मध्ये मूलभूत हक्क समाविष्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे भाग तीनला भारताची मॅग्नाकार्टा असे म्हटले जाते.घटनाकर्त्यांनी हे मूलभूत हक्क अमेरीकेच्या घटनेवरून घेतले आहेत.

भारताच्या राज्यघटनेतील भाग III मध्ये मूलभूत हक्कांची एक मोठी व सर्वसमावेशक यादी देण्यात आली आहे. खरे तर आपल्या घटनेतील मूलभूत हक्क जगातील इतर कोणत्याही घटनेतील हक्कांपेक्षा अधिक विस्तृत आहेत.
What Is Fundamental Right? मुलभुत हक्क म्हणजे काय? मुलभुत हक्कांचा अर्थ महत्व व वैशिष्टये कोणते? मुलभुत हक्क किती व कोणते?

 

मूलभूत हक्कांचा अर्थ व महत्त्व:-


अर्थ -देशाच्या घटनेत समाविष्ट करण्यात आलेल्या हक्कांना मूलभूत हक्क असे म्हणतात. म्हणजेच घटनेतील मूलभूत हक्कांचे यादीमध्ये नसलेले इतर कोणत्याही हक्कांना मूलभूत हक्काचा दर्जा प्राप्त होत नाही.

यावरून या हक्कांना मूलभूत हक्क असे का म्हणतात कारण:-

1. ते राज्यघटनेमध्ये समाविष्ट केलेले असतात.राज्यघटना देशाचा मूलभूत कायदा आहे.

2. हे अधिकार न्यायप्रविष्ठ असतात व त्यांचे उल्लंघन झाल्यास न्यायालयामार्फत ते पुन्हा प्राप्त करून घेता येतात.

3. हे अधिकार सर्व प्रकारच्या सार्वजनिक प्राधिकाऱ्यांवर बंधनकारक असतात. तसेच काही अधिकार खाजगी व्यक्तींविरुद्ध ही प्राप्त होतात.

मूलभूत हक्कांचे महत्व:-


1. हे अधिकार सर्व नागरिकांचा संपूर्ण शारीरिक, मानसिक,नैतिक व अध्यात्मिक विकास सुनिश्चित करतात. त्यामध्ये अशा मूलभूत स्वातंत्र्यांचा समावेश असतो. ज्यामुळे जीवन जगण्यायोग्य बनते.

2. हे अधिकार बहुसंख्यांकांच्या राज्यकारभारासाठी लोकशाही नीती मान्यतेचा आराखडा निर्माण करतात. मात्र त्याचबरोबर देशातील अल्पसंख्याकांमध्ये सुरक्षिततेची भावना ही निर्माण करतात. कोणतीही लोकशाही भाषण व अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्य सारख्या हक्कांविना अस्तित्वात राहू शकत नाही.

3.मूलभूत अधिकार देशात राजकीय लोकशाहीचा आदर्श प्रस्थापित करतात.

i)मूलभूत हक्क देशात एकाधिकारशाही व जुलमी सत्ता प्रस्थापित होण्यास प्रतिबंध करतात व राज्य संस्थेच्या आक्रमणापासून जनतेच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करतात.

ii) मूलभूत हक्क कार्यकारी मंडळाच्या जुलमी कृतींवर आणि कायदेमंडळाच्या असंगत कायद्यांवर मर्यादा घालण्याचे कार्य करतात.

iii) थोडक्यात ते म्हणजे माणसांचे नव्हे तर कायद्याचे शासन प्रस्थापित करण्यास प्रयत्न करतात.

मूलभूत हक्कांची वैशिष्ट्ये-


1.मूलभूत हक्क घटनेचा अविभाज्य भाग असून ते साधारण कायद्याद्वारे बदलता किंवा रद्द करता येत नाहीत.

2. मूलभूत हक्क घटनेचा भाग III हा जगातील कोणत्याही घटनेतील मूलभूत हक्कांपेक्षा अधिक विस्तृत व विश्लेषणात्मक आहे.

3. घटनेतील मूलभूत हक्क हे निसर्गाने मानवाला बहाल केलेले नैसर्गिक हक्क नव्हेत. फक्त घटनेत उल्लेख केलेले हक्कच मूलभूत हक्क आहेत. या यादीमध्ये नसलेल्या कोणत्याही इतर हक्कांना मूलभूत हक्कांचा दर्जा नाही.

4. काही मूलभूत हक्क हे नकारात्मक स्वरूपाचे आहेत. तर काही मूलभूत हक्क आहे सकारात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजे ते राज्यसंस्थेला काही कृती करण्यास प्रतिबंध करतात. उदाहरण पदव्या रद्द करणे,(कलम 18 )या उलट काही हक्क सकारात्मक स्वरूपाचे आहेत. म्हणजे ते जनतेला काही हक्क मिळवून देतात.उदाहरण स्वातंत्र्य व समानतेचा हक्क

5. मूलभूत हक्क अमर्यादित नसून गुणात्मक आहेत. म्हणजेच राज्यसंस्था त्यांच्यावर पर्याप्त मर्यादा घालू शकते. मात्र अशा मर्यादा पर्याप्त आहेत की नाही हे ठरविण्याचा अधिकार न्यायालयांना आहे.अशा रीतीने मूलभूत हक्क,व्यक्तींचे हक्क व संपूर्ण समाजाचे हक्क यामध्ये आणि पर्यायाने वैयक्तिक स्वातंत्र्य व सामाजिक नियंत्रण यामध्ये संतुलन निर्माण करते.

6. मूलभूत हक्क हे न्यायप्रविष्ठ आहेत. म्हणजेच त्यांचे उल्लंघन झाल्यास ते सर्वोच्च न्यायालयाकडून किंवा उच्च न्यायालयाकडून पुन्हा पुन्हा प्राप्त करून घेता येतात. अर्थात त्यांची पुनर्प्राप्ती सर्वोच्च न्यायालयाकडून करून घेणे हा कलम 32 अंतर्गत मूलभूत हक्क आहे. तर त्यांची पुनर्प्राप्ती कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालयाकडून करून घेणे हा मात्र मूलभूत हक्क नाही

भारतीय घटनेतील मूलभूत हक्क:-


भाग III मधील कलम 12 ते 35 पैकी कलम 14 पासून कलम 32 पर्यंत मूलभूत हक्क दिलेले आहेत.

मूळ घटनेमध्ये मूलभूत हक्कांचे सात गट देण्यात आले होते

1. समानतेचा हक्क:- कलम 14 ते कलम 18

2. स्वातंत्र्याचा हक्क:-कलम 19 ते 22

3 शोषणाविरुद्ध हक्क:- कलम 23 ते 24

4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क:-कलम 25 ते 28

5. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क :-कलम 29 ते 30

6. संपत्तीचा हक्क:- कलम 31

7. घटनात्मक उपायांचा हक्क :-कलम 32

मात्र संपत्तीचा हक्क 44 व्या घटना दुरुस्तीने 1978 मूलभूत हक्कांच्या यादीतून वगळण्यात आला आणि तो भाग 12 मध्ये प्रकरण सहा मधील कलम 300 A मध्ये टाकून एक कायदेशीर हक्क म्हणून घोषित करण्यात आला.त्यामुळे घटनेत सध्या मूलभूत हक्कांचे सहा गट आहेत.


या मूलभूत हक्कांची यादी पुढीलप्रमाणे आहे


1 .समानतेचा हक्क कलम 14 ते 18


i) कलम 14- कायद्यापुढे समानता


ii) कलम 15- धर्म,वंश,जात,लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई.

iii) कलम 16- सार्वजनिक रोजगार बाबत समान संधी.

iv) कलम 17- अस्पृश्यता नष्ट करणे.

v)कलम 18- किताब नष्ट करणे.

2.स्वातंत्र्याचा हक्क:- कलम 19 ते 22


i) कलम १९- भाषण स्वातंत्र्य इत्यादी संबंधित विवक्षित हक्कांचे संरक्षण.


ii) कलम 20 अपराधन बद्दलच्या दोषिद्दीबाबत संरक्षण.

iii) कलम 21- जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्य यांचे संरक्षण.

iv) कलम 21 A- शिक्षणाचा हक्क

v)कलम 22 विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण .

3.शोषणाविरुद्धचा हक्क:- कलम 23 ते 24


i) कलम 23- माणसांचा अपय व्यापार व वेठबिगारी यांना मनाई.


ii) कलम 24- कारखाने इत्यादींमध्ये बालकांना कामाला ठेवण्यास मनाई.

4. धर्म स्वातंत्र्याचा हक्क- कलम 25 ते 28


i) कलम 25- सदसदवेकबुद्धीचे स्वातंत्र्य आणि धर्माचे मुक्त प्रकटीकरण आचरण व प्रचार.


ii)कलम 26- धर्मनिरपेक्ष व्यवहारांची व्यवस्था पाहण्याचे स्वातंत्र्य.

iii) कलम 27- एखाद्या विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याविषयी स्वातंत्र्य.

iv) कलम 28- शैक्षणिक संस्थांत, धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहणे विषयी स्वातंत्र्य.

5.सांस्कृतिक व शैक्षणिक हक्क:- कलम 29 ते 30


i) कलम 29- अल्पसंख्यांक वर्गाच्या हितसंबंधांचे संरक्षण.


ii) कलम 30- अल्पसंख्यांक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापन करण्याचा व त्यांचे प्रशासन करण्याचा हक्क.

6. घटनात्मक उपायांचा हक्क:- कलम 32


i) कलम 32- भाग III ने प्रदान केलेले हक्क बजावण्याकरता उपाय .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत

Blogger द्वारे प्रायोजित.