IPC 1860 INDIAN LAW कलम 299 सदोष मनुष्यवध म्हणजे काय? आणि कलम 300 खुन म्हणजे काय?
IPC 1860 INDIAN LAW
कलम 299 सदोष मनुष्यवध म्हणजे काय? आणि कलम 300 खुन म्हणजे काय?
कलम 299 सदोष मनुष्यवध म्हणजे काय?
याची व्याख्या या कलमात दिलेली आहे. या कलमाचे ३ भाग केले आहेत. पहील्या भागात ५ घटक सांगितलेली आहेत. दुसऱ्या भागात ते समजण्याकरिता अ,ब,क उदाहरणे दिलेली आहेत. आणि तिसऱ्या भागत ते समजण्याकरीता ३ खुलासे/ स्पष्टीकरणे दिलेली आहेत.
व्याख्या :-सदोष मनुष्यवध:-
मृत्यु घडवुन आणण्याच्या उद्देशाने अथवा जिच्यामुळे मृत्यु घडुन येणे संभवनीय आहे.अशी शारीरिक जखम करण्याच्या उद्देशाने तसेच एखाद्या कृतीमुळे आपण मृत्युस कारणीभुत होण्याचा संभव आहे. याची जाणीव असतांना, जो कोणी अशी कृती करुन मृत्यु घडवितो त्याने सदोष मनुष्यवध केला असे म्हणतात.
1. यात खालीलप्रमाणे ५ घटक दिलेले आहेत
1.एक मनुष्य दुसऱ्या माणसाला ठार करतो.2.ठार करण्यामागे कृती केलेली आहे.
3.कृती करण्यामागे इरादा असतो.
4.अगर जाणीव किंवा माहिती असते.
5.अगर अशी दुखापत असते की मृत्युची शक्यता असते.
2.उदा:-
अ) ए हा एका खड्ड्यावर काड्या गवत व माती टाकुन ठेवतो.त्यामुळे मृत्यु घडवुन आणावा असा त्याचा उद्देश आहे. अगर मृत्यु घडुन येणे संभवणीय आहे. याची त्याला जाणीव आहे. ती जमीन पक्की आहे असे समजून बी त्यावरुन चालत जातो आणि त्यात पडुन मरतो. तर ए याने सदोष मनुष्यवधाचा अपराध केला आहे.
ब)ए हा झुडुपांच्या मागे आहे हे बी यास माहीत आहे, परंतु ते सी यास माहीत नाही. ए याचा मृत्यु घडवुन आणण्याच्या उद्देशाने किंवा तो घडुन येण्याचा संभव असतांना बी हा सी यास झुडुपावर गोळी झाडण्यास प्रवृत्त करतो, तर येथे सी याने कोणताही अपराध केला नसेल, पण बी मात्र सदोष अपराधाबद्दल दोषी आहे.
क) ए याने एका पक्ष्याला मारण्याचया व चोरुन नेण्याच्या उद्देशाने गोळी झाडल्यामुळे त्या झुडुपाआड असलेला बी मारला जातो. तो तिकडे असल्याचे ए यास माहीत नव्हते, तर ए हा बेकायदेशीर कृत्य करत असला, तरी तो मनुष्यवधाचा अपराध करत नाही. कारण त्याचा बी ला मारण्याच उद्देश नव्हता, अगर ज्यामुळे मृत्युचा संभव असल्याचे माहीत आहे अशी कृती करण्याचा त्याचा उद्देश नव्हता.
3. स्पष्टीकरण:- 3 दिलेले आहेत.
स्पष्टीकरण १ :-जखमी व्यक्ती आजारी असतो, म्हणजेच त्याला शारीरिक रोग किंवा व्यंग असतो. हे माहीत असुन त्याला त्याच्या शरीराच्या नाजुक भागावर हलका टोला मारुन जरी मृत्यु घडुन आला तरी त्याने ठार केले असे म्हणतात.
२.एखाद्या जखमी व्यक्तीस ताबडतोब डॉक्टरकडे नेले नाही आणि उपचार केले नाही म्हणुन तो मरण पावला असा बचाच आरोपीला घेता येत नाही.
3.एखाद्या गर्भवती स्त्रीच्या पोटात मूल असते. असे मुल जर पोटातल्या पोटात ठार मारले गेले तर तो सदोष मनुष्यवध नसतो.परंतु आयपीसी कलम 315 अगर 316 चा गुन्हा होतो. या गुन्ह्याकरीता कलम 304 दिलेले आहे.त्यात 2 प्रकारच्या शिक्षा सांगितलेल्या आहेत.
कलम 304-1 हेतुपरस्सर कृत्य केल्यास जन्मठेप अगर 10 वर्ष कलम 304 -2 प्रमाणे इरादा नसल्यास १० वर्ष अगर केवळ दंड म्हणजेच या पोटकलमाखाली आरोपीला कमी शिक्षा होउ शकते.
कलम 300 खुन किंवा सदाष मनुष्यवध खुन केव्हा होतो ?
कलम 300 मध्ये खुनाची व्याख्या दिलेली आहे. त्यामध्ये ४ घटक सांगितले आहेत. ते खालीलप्रमाणे – 1.हेतुपुरस्सर कृत्य करणे म्हणजेच आरोपीचा इरादा ठार मारण्याचा असतो. इरादा समजण्याकरीता काही वेळेस प्रत्यक्ष साक्षीदार असतात, तर काही वेळेस खुन करण्यामागे काय प्रेरणा होती याचा पुरावा गोळा कारावा लागतो.हा घटक समजण्याकरीता उदा अ दिलेले आहे.
2. घटक दोन प्रमाणे आरोपीला मयत व्यक्तीच्या शरीराबद्दल पुर्वज्ञान असते. म्हणजेच त्याचे शरीराचा एखादा भाग रोगग्रस्त आहे किंवा नाजुक आहे हे माहीत असुन त्याच भागावर हलका टोला मारतो. हा घटक समजण्याकरीता घटक ब दिलेला आहे.
3.या ठिकाणी केलेली शारीरीक जखम निसर्ग नियमाप्रमाणे मृत्यु येण्यास पुरेशी असते म्हणजेच वापरलेले हत्यार आणि शरीराचा भाग यांचा संबंध असतो. हा घटक समजण्याकरीता उदा. क दिलेले आहे.
4. या ठिकाणी इरादा नसतो, परंतु केलेले कृत्य अत्यांत धोकादायक असते. की ज्यामुळे मृत्यु हमखास येतो. हा घटक समजण्याकरीता उदा ड दिलेले आहे.
अंधश्रध्देच्या घटना तसेच पाण्यात विष टाकणे या घटना यामध्ये पडतात. खनाकरीता शिक्षाकलम 302 दिलेले आहे. त्याप्रमाणे फाशी अगर जन्मठेप सांगितलेली आहे. फाशी अपवादात्मक परीस्थितीत दिली जाते.
सदोष मनुष्यवध खुन केव्हा नसतो.
याकरीता कलम 300 मध्ये 5 अपवाद सांगितले आहेत.ते खालीलप्रमाणे-
1. रागाचे भरात:- रागाचे कारण गंभीर आहे आणि ते कारण घडल्यानंतर लगेच त्याच ठिकाणी तात्काळ ठार केल्यास खुन नसतो.
2. अचानक भांडण झाल्यास:- काही वेळेस आरोपी आणि मयत व्यक्ती यांचे अचानक भांडण होते. आणि ती व्यक्ती मारली जाते. परंतु याठिकाणी आरोपी भांडणाच गैर फायदा घेत नाही अगर क्रुरपणे वागत नाही.
3. आत्मसंरक्षणाचा अधिकार :- कायद्याप्रमाणे कलम 100,103 प्रमाणे ठार मारण्याचा अधिकार आहे. तसेच कलम 99 च्या मर्यादा सांगितल्या आहेत. या कलमांचे उल्लंघन करुन ठार केले तर खुन नसतो.
4. सरकारी नोकर काम करीत असतांना:- आपीसी कलम २१ मधील काही लोकसेवकांना अटकेचे अधिकार आहेत अगर इतर अधिकार आहेत पण कायद्याची मर्यादा ओलांडुन जर मृत्यु घडविला तर खुन नसतो. उदा.पोलीस अधिकाऱ्याला अटकेचे अधिकार दिलेले आहेत. पण त्याला काही मर्यादा आहे. सीआरपीसी कलम 43-3 त्यापेक्षा बाहेर गेल्यास 304 प्रमाणे गुन्हा होतो.
5. संमंतीने केलेले कृत्य:- एखाद्या कुटुंबात असाध्य रोगाने मनुष्य आजारी असतो किंवा हजर ठिकाणी मयत इसम मला ठार मारा अशी संमती देतो आणि जो 18 वर्षापेक्षा जास्त वयाचा असातो असे झाल्यास खुन नसतो.
|
अ.क्र. |
सदोष मनुष्यवध (क.299) |
खून(क.300) |
|
1 |
सदोष मनुष्यवधाची व्याख्या क.299 मध्ये दिली आहे. |
खुनाची व्याख्या 4 घटक देवुन क.300 मध्ये देण्यात आली आहे. |
|
2 |
सदोष मनुष्यवध कमी शिक्षा आहे. किंवा दंड आहे |
खुनाकरीता क.302 प्रमाणे फाशी किंवा जन्मठेप आहे. |
|
3 |
सदोष मनुष्यवधाखाली पुर्वज्ञान नसते. क.299 उदा. अ |
खुनामध्ये मयत व्यकतीच्या शरीराचे पुर्वज्ञान
असते.उदा. ब |
|
४ |
सदोषमनुष्यवधाखाली केलेली शारीरिक जखम निश्चित मृत्यु
आणत नाही. |
या ठिकाणी वापरलेले हत्यात आणि शरीराचा भाग महत्वाच
असतो. उदा क |
|
5 |
या ठिकाणी मृत्युचा संभव किंवा शक्यता नसते. |
मृत्यु हमखास
असतो. |

Post a Comment