इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे काय ? WHAT IS INQUEST PANCHNAMA?
Cr.PC.1973 (फौजदारी प्रक्रीया संहीता 1973)
इन्क्वेस्ट पंचनामा म्हणजे काय ? WHAT IS INQUEST PANCHNAMA? अकस्मात मृत्युची चौकशी म्हणजे काय ? ती कशी व कोणामार्फत केली जाते?
मित्रांनो आपण आजच्या लेखात फौ.प्र.सं.1973 या कायद्यातील कलम 174 आणि कलम 176 यांचा अभ्यास करणार आहोत. यामागचा उद्देश सर्वसामन्य माणसाला कायदा साक्षर करणे आहे.
कलम 174 आत्महत्या इत्यादींबाबत पोलीसांनी चौकशी करुन अहवाल द्यावा ? इन्क्वेस्ट(INQUEST)पंचनामा .
क.174 नुसार जर खाली दिलेल्या 6 कारणांकरीता मृत्यु घडुन आला असेल तर इन्क्वेस्ट पंचनामा करावा लागतो.
क.174-1 या पोटकलमाप्रमाणे खालील सहा कारणे दिलेली आहेत. 1.आत्महत्या 2.खुनाची केस 3.प्राण्याने दंश केल्यास 4.यांत्रिक अपघात 5.इतर कोणताही अपघात 6.संशयित मृत्यु.
क.174.2 सदर कलमाचा उद्देश प्रेताचे वर्णन व ओळख पटविणे हा महत्वाचा भाग असतो. आणि त्यामुळे सविस्तर वर्णन लिहावे लागते.
क.174-3 पोस्टमॉर्टम केव्हा सक्तीचे आहे ?
याकरीता पोटकलम 3 दिलेले आहे.त्यामध्ये खाली दिलेली पाच कारणे आहेत.
1. विवाहित स्त्रीने लग्न झाल्यापासुन 7 वर्षाचे आत आत्महत्या केलेली आहे.
2. विवाहीत स्त्रीचा मृत्यु लग्न झाल्यापासुन 7 वर्षाचे आत तिला जाळपोळ करुन अगर जखमा करुन झालेला आहे.
3. विवाहीत स्त्रीचा मृत्यु विवाहापासुन 7 वर्षाचे आत झालेले आहे.
4. विवाहीत स्त्रीच्या नातेवाईकांनी पोस्ट मॉर्टेम (P.M.)करणेबाबत विनंती केली आहे.
5. पोलीस अधिकाऱ्यास पी.एम.करणे आवश्यक वाटते.
ही सुधारण 25.12.1983 रोजी केलेली आहे.
1.जिल्हा दंडाधिकारी (DM) 2.उपविभागीय दंडाधिकारी (SDM) 3.राज्य शासनाने खास अधिकार दिलेला कार्यकारीदंडाधिकारी (तहसीलदार)
इन्क्वेस्ट पंचनाम्याच्या विविध केसेस मध्ये न्यायालयांनी काही मत नोंदविलेली आहेत ते इथे देत आहे.
1. मृत्यु पंचानाम्यामध्ये आयविटनेसची नावे नमुद करणे आवश्यक नाही.
2. मृत्यु पंचनाम्यामध्ये अरोपीचे कायद्याने नाव असणे आवश्यक नाही.
3. मृत्यु पंचनाम्यामध्ये, घटनेचे सविस्तर वर्णन असणे आवश्यक नाही.
4. पोस्ट मॉर्टम करतांना वैद्यकीय अधिकाऱ्या पुढे मृत्यु पंचनामा पाठविला नाही, म्हणुन वैद्यकीय पुरावा अविश्वसनिय समजता येणार नाही.
5. तपासी अमलदाराने जे पाहीले ते मृत्यु पंचनाम्यात नमुद केले. तेवढाच भाग स्विकारार्ह आहे. परतु तपासी अमलदाराने दुसऱ्या व्यक्तीकडुन जे ऐकले ते त्याने मृत्यु पंचनाम्यात नमुद केले तर त्यास कलम 162 चा (सीआरपीसी) बाधा येईल.
क.176 अकस्मात मृत्युबाबत दंडाधिकाऱ्यांनी चौकशी करावी.
176-1.या पोटकलमाप्रमाणे कोणत्याही कार्यकारी दंडाधिकाऱ्यास चौकशी करता येते म्हणजेच पोलीसांच्या चौकशिशिवाय स्वतंत्र चौकशी करता येते. आणि त्याकरीता साक्षीदारांना स्वतंत्र समन्स काढणे, हजर करणे आणि शपथेवर साक्ष लिहुन घेणे असे अधिकार आहेत.
(1 अ ) जेव्हा –एखादी व्यक्ती मरण पावली असेल, किंवा बेपत्ता झाली असेल किंवा
(ब) एखाद्या महीलेवर बलात्कार झाला असेल तेव्हा, ती महीला पालीस कोठडीत किंवा दंडाधिकारींनी किंवा न्यायालयाने मान्यता दिलेल्या कोठडीत असेल तर पोलीसांनी केलेली चौकशी अगर तपासाशिवाय , तो अपराध ज्यांच्या कार्यक्षेत्रात घडला असेल अशा न्यायदंडाधिकाऱ्यांकडुन सुध्दा चौकशी करण्यात येईल.
क.176-2 अशा प्रकारची साक्ष लिहुन घेताना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना कोर्टाप्रमाणे अधिकार असतील.
क.176-3 अशी चैकशी चालु असतांना MAGISTRATE ला असे वाटते की, एखादे प्रेत धार्मिक पध्दतीने पुरलेले आहे, याचा नंतर संशय व्यक्त केला असेल तर ते प्रेत उकरुन त्याचा पंचनामा करण्याचा अधिकार देखील दंडाधिकाऱ्यांना आहे.
176-4 वरील प्रमाणे चौकशी चालु असतांना मयत इसमाच्या नातेवाईकांनी शक्य झाल्यास हजर राहता येते.
176-5 पोटकलम (1अ) अन्वये चौकशी किंवा तपास करणारा यथास्थिती जिल्हा दंडाधिकारी (DM ) किंवा उपविभागीय दंडाधिकारी (SDM) किंवा कार्यकारी दंडाधिकारी (Executive Magistrate) किंवा पोलीस अधिकारी एखाद्या व्यक्तीचा मृत्यु झाल्यापासुन चोविस तासात मृतदेह तपासणी करणेसाठी जिल्हा शल्यचिकीत्सकाकडे किंवा त्यासदंर्भाता राज्याशासन नियुक्त करील अशा अहर्ताप्राप्त अधिकाऱ्याकडे पाठविण्यात यावा. तसे करणे कोणत्याही कारणासाठी शक्य नसल्यास ती कारणे लेखी नमुद करतील.
(नातेवाईक या शब्दाचा अर्थ आई-बाप, अपत्य,भाऊ-बहीण, पती-पत्नी असा घ्यावा.)
वरील लेखात आपण INQUEST पंचनामा म्हणजे काय ते समजुन घेतले. तसेच इन्क्वेस्ट पंचनामा करण्याचा अधिकार कोणाला आहे हे समजुन घेतले. तसेच अकस्मात मृत्यु झाल्यावर चौकशी करण्याचा अधिकार कोणाला आहे याची माहीती घेतली. वरील माहीती आवडल्यास शेअर करा. कमेंट करुन सुचना द्या, आपल्या सुचनांचा आदरपुर्वक स्विकार केला जाईल. धन्यवाद .

Post a Comment