चोरी, जबरी चोरी, बलादग्रहण(खंडणी), दरोडा म्हणजे काय ? What is theft, Docoity,Extortion and Robbery ?
I.P.C. 1860 प्रकरण 17
चोरी,
जबरी चोरी, बलादग्रहण(खंडणी), दरोडा म्हणजे काय ?
What is
theft, Docoity,Extortion and Robbery ?
मित्रांनो
आपण आजच्या लेखात भारतीय दंड संहिता 1860 प्रकरण 17 मधील खुप महत्वाचा टॉपिक
अभ्यासणार आहोत. ज्यात आपण चोरी, जबरी चोरी,खंडणी आणि दरोडा यात काय फरक आहे आहे
याचा अभ्यास करणार आहोत.
कलम 378 – चोरी करणे.
या कलमात चोरीची व्याख्या दिलेली आहे.
जो कोणी,
कोणत्याही व्यक्तीच्या ताब्यातुन, कोणतीही जंगम मालमत्ता, त्याच्या (मालकाच्या)
संमतीवाचुन, अप्रमाणिकपणे घेवुन जाण्याच्या उद्देशाने,हलविल तर त्याने चोरी केली
असे म्हणता येईल.
(जंगम
मालमत्ता- (MOVABLE PROPERTY)म्हणजे अशी मालमत्ता जी एका जागेतुन
दुसऱ्या जागी हलविता येईल.)
चोरीच्या
व्याख्येत 5 घटक महत्वाची आहेत.
1.कपटाने
अगर लबाडीने 2.जंगम माल 3.हलविला जातो 4.हलविण्यापुर्वी जंगम माल फिर्यादीच्या
ताब्यात असतो.
5.संमती
नसते.
चोरीचे
2 प्रकार आहेत. 1.उघड्या जागेतील चोरी 2.बंदीस्त घरातुन चोरी.
क.379 उघड्या जागेतील चोरी
आरोपीने जर उघड्या जागेतुन चोरी केली तर
त्याला 3 वर्षापावेतो शिक्षा व दंड आहे. सदरचा गुन्हा जर रु.2000 च्या आत असेल तर
कोर्टात आपसात मिटविता येतो. (सदरची सुधारणा 23.06.2006 रोजी करण्यात आली आहे.)
क.380 बंदीस्त घरातुन चोरी करणे-
एखाद्या इमारतीतुन किंवा तंबुमधून किंवा
जहाजमधुन चोरी केली असेल तर, या कलमाप्रमाणे गुन्हा होतो. सदरचा गन्हा दखलपात्र
असुन शिक्षा 7 वर्षापावेतो असते. (इमारत याचा अर्थ जेथे माणसे राहतात किंवा
मुद्देमाल ठेवलेला आहे. एखादे मंदीर, चर्च, मशिद, असा आहे.सदरचा गुन्हा आपसात
मिटविता येत नाही.)
क.383 जुलमाने घेणे किंवा खंडणी किंवा बलादग्रहण (EXTORTION)
कलम 383 मध्ये खंडणीची (बलादग्रहण)ची
व्याख्या दिलेली आहे. ती खालीलप्रमाणे-1.आरोपी फिर्यादीला भीती दाखवितो. 2. सदरची
भीती नुकसान करण्याची असते. 3. नुकसान 4 प्रकारचे असते. (1) शारीरिक (2) मानसिक (3)
मिळकतीचे (4) अब्रुचे
वरीलप्रमाणे भिती दाखविल्यानंतर फिर्यादी
आरोपीला खालील प्रकारची मालमत्ता देत असतो. जंगम (MOVABLE PROPERTY)किंवा
स्थावर मालमत्ता (NON MOVABLE PROPERTY- अशी
मालमत्ता जी एका जागेवरुन दुसऱ्या जागी हलविता येत नाही. जमिनीशी सलग्न असते.) रोकड
रक्कम, किंमती दस्तएवज किंव कोऱ्या स्टँपवर सही शिक्का मारुन आरोपीला देतो.
वरील गुन्ह्याला वेगवेगळे शिक्षा कलम आहेत. म्हणजे
गुन्हा जर पुर्ण झाला तर कलम 384,386,388 लावतात. परंतु जर गुन्हा अपुर्ण राहीला
म्हणजे फक्त प्रयत्न झाला तर कलम 385,387,389 लावतात. क.384 नुसार शिक्षा 3 वर्षे
आहे.
क.390 जबरी चोरी (DOCOITY)
जेव्हा चार किंवा
त्यापेक्षा कमी व्यक्ती चोरी करतांना, किंवा चोरीचा माल घेवुन जाताना, आरोपी चोरीचा
उद्देश साध्य करतांना खालील गोष्टी करतो.
1.फिर्यादीला
ठार मारतो. 2किंवा दुखापत करतो. 3.किंवा प्रतिबंध करतो 4.किंवा वरील प्रकारची भीती
दाखवतो. तेव्हा जबरी चोरीचा अपराध होतो.
सदर
गुन्ह्याला शिक्षा कलम 392,393,394 दिलेली आहेत.
क.392
नुसार जबरी चोरीचा गुन्हा जर पुर्ण झाला
तर 10 वर्षापावेतो शिक्षा आहे. हाच गुन्हा जर एखाद्या महामार्गावर सुर्यास्तानंतर
व सुर्यादयापुर्वी घडला तर कडक शिक्षा- 14 वर्षापावेतो होते.
क.393
जबरी चोरीचा गुन्हा अपुर्ण राहील्यास कमी शिक्षा 7 वर्षापावेतो असते.
क.394
नुसार जबरी चोरीचा गुन्हा करीत असतांना आरोपीने दुखापत केली तर, दुखापत करणारा
आरोपी आणि त्याचे साथीदार म्हणजेच एकुण 4 आरोपींपर्यंत या कलमाप्रमाणे जन्मठेप अगर
10 वर्षापावेतो शिक्षा होते. म्हणजेच एका आरोपीच्या कृत्याकरीता सर्वांनाच जबाबदार
धरले जाते.
READ MORE पोलीस काेठडी म्हणजे काय
क.391 दरोडा
जर आरोपींची संख्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त
असेल, व ते एकत्रितपणे जबरी चोरीचा गुन्हा करतात किंवा तसा प्रयत्न करतात तेव्हा जबरी
चोरीचे रुपांतर दरोड्यात होते.
म्हणजेच दरोडाचा गुन्हा घडण्यासाठी आरोपींची
संख्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक असते. आरोपींची संख्या 5 पेक्षा कमी
असेल तर तो गुन्हा जबरी चोरीचा होतो.
दरोडा
साठी शिक्षा कलम 395 आहे. कलम 395 नुसार दरोडा साठी शिक्षा जन्मठेप अगर 10 वर्षे आहे
.गुन्हा – दखलपात्र व सेशन कमीट आहे.
फरक
|
अ.क्र. |
साधी
चोरी 379 |
जुलमाने
घेणे(खंडणी) 383 |
|
1. |
या
ठिकाणी फक्त जंगम माल असतो. |
या
ठिकाणी जंगम व स्थावर माल असतो. तसेच किंमती दस्तएवज असतो. |
|
2 |
या
ठिकाणी भीती नसते. |
या
ठिकाणी भीती दाखवली जाते. |
|
3 |
या
ठिकाणी आरोपी माल हलवितो. |
या
ठिकाणी भीती दाखवल्यामुळे फिर्यादी स्वत:हुन आरोपीकडे माल आणुन देतो. |
फरक
|
अ.क्र. |
जबरी
चोरी 390 |
दरोडा
391 |
|
1 |
या
ठिकाणी आरोपींची संख्या जास्तीत जास्त 4 असते. |
या
ठिकाणी आरोपींची संख्या 5 किंवा त्यापेक्षा जास्त असते. |
|
2 |
जबरी
चोरीचा प्रयत्न झाल्यास स्वतंत्र क.393 आहे. |
या
ठिकाणी दरोड्याचा प्रयत्न झाला तरी क.395 लागतो. |
अशा
प्रकारे आपण वरील लेखात चोरी, जबरी चोरी ,खंडणी ,दरोडा यातला फरक सहज आणि सोप्या
भाषेत समजुन घेतला आहे. माहीती आवडल्यास माहीती शेअर करा. आणि ब्लॉगला फॉलो करा.

Post a Comment